
एसआयपी म्हणजे systematic Investment plan होय .एसआयपी म्हणजे दर महिन्याच्या ठरावीक दिवसाला ठरावीक रकमेची केली जाणारी गुंतवणूक होय . उदा . पोष्टाची पीपीएफ किंवा सरकारी नोकरांची जीपीएफ ही एसआयपी आहे . तेजी मंदीच्या बाजारात भांडवल सुरक्षीत ठेेवून नफा कमवण्यासाठी ही पध्दत चांगलीी आहे . तुम्हाला शेअर बाजारातील वेळ साधण्याची गरज नसतेेे . ठरावीक रक्कम , ठरावीक वेळेला अनेक वर्ष गुंतवल्यामूळे रुपयाची सरासरी होऊन चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो. यामध्ये गणितामधील सरासरीच्या नियमाचा फायदा होतो . म्हणून या पद्धतीला रुपी कॉस्ट अॅव्हरेजींग असेही म्हणतात . चांगल्या म्यूच्यूअल फंडात वर्षाला २०- ३० % नफा मिळतो .जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांचे गुरू बेेंजामिन ग्राहम यांनी गुंतवणूूकीचे “मार्जिन ऑफ सेफ्टी ” सूत्र सांगितलेेे आहे . त्या सूत्राचा फायदा एसआयपीमूळे होतो. मुलामूलींचे शिक्षण, घर घेणे, मूलीचे लग्न, निवृत्तीवेेतन फंड यासाठी एसआयपी करणे उत्तम मार्ग आहेे . ज्यांना बाजारची दिशा समजत नाही, बीजनेेसमूळं वेळ नाही त्यांना ही पद्धत खूप चांगली आहेे . दिवस, आठवडा, महिना,पंधरा दिवस, सहा महिने या काळाची एसआयपी करता येतेे .
म्यूच्यूअल फंड आणि शेअर बाजारातील शेअर या दोन्ही ठिकाणी एसआयपी करता येते .
#एसआयपी गुंतवणूक फायदे आणि वैशिष्ट्ये
१ ) शिस्तबध्द बचत आणि गुंतवणूक :
सेंसेक्स पडला म्हणून घाबरू नका आणि वर चढला म्हणून हर्षवायू होण्याची गरज नाही .पानगळ म्हणजे मृत्यू नसून नवपालवीची उंच गुडी असते . बाजार पडला तर खरेदी जास्त होते .बाजार चढला तर पैशाच्या कणसांची कापणी केली जाते . ECS system मुळे एसआयपी चा हप्ता बँकेच्या खात्यातून परस्पर कापून घेतला जातो . म्हणून गुंतवणूकमध्ये सातत्य राहते . शिस्त आहे . रिस्क कमी आहे . तेजी मंदीची काळजी करण्याची गरज नाही .
२ ) चक्रवाढ व्याजाचा फायदा : (Power of Compounding Growth )
पीपीएफ किंवा जीपीएफ मध्ये ज्याप्रमाणे नियमीत बचत करून वर्षाला सरकारी नियमानुसार आठ टक्केपेक्षा जास्त चकवाढ व्याजाने फायदा मिळतो . तसाच म्यूच्यूअल फंड किंवा शेअरमधील एसआयपीमध्ये वर्षाला वीस तीस टक्के चक्रवाढ व्याजाने नफा मिळू शकतो . कमीत कमी पाचशे रुपये सुद्धा दरमहा गुंतवणूक करता येते . तेज मंदीच्या नैसर्गिक चक्रामूळे रुपयाची सरासरी होत राहते . आपल्या गुंतवणूकीची Reinvestment म्हणजे पूनरगुंतवणूक होऊन चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो . जर तुम्ही एक रुपया वार्षिक पंधरा टक्के चक्रवाढ व्याज दराने गुंतवला तर त्याचे पाच वर्षात दोन रुपये होतात . दहा वर्षात चार रुपये होतात .पंधरा वर्षांनंतर एक रुपयाचे आठ रुपये होतात . तीस वर्षात एक रुपयाचे पंधरा टक्के चकवाढ व्याज दराने फक्त चौसष्ट रुपये होतात . म्हणून प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी चक्रवाढ व्याजाच्या चमत्काराला जगातील आठवे आश्चर्य म्हटले आहे . एखादया पंचवीस वर्षाच्या तरुणाने दर महिन्याला फक्त १५५५ रुपयांची एसआयपी वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत करून फक्त बारा टक्केने गुंतवणूक केली तर त्याचे एक कोटी रुपये होतात . एखाद्या पंचवीस वर्षाच्या तरुणाने दर महिन्याला फक्त ६८१ रुपयांची एसआयपी वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत करून फक्त पंधरा टक्के चक्रवाढ व्याजाने गुंतवणूक केली तर त्याचे एक कोटी रुपये होतात . आज सामान्य माणूसही दर महिन्याला त्याच्या मोबाईलसाठी पाचशे रुपयांचा रिचार्ज सहज मारतो . मग दर महिन्याला फक्त एक हजार रुपयांची एसआयपी करून कोट्याधीश व्हायला काय हरकत आहे ?चहापाणी, तंबाकूवर महिन्याला अनेकांचे हजार रुपये . सहज खर्च होतात . मग बचत करायलाच काय अडचण आहे ?

३ ) आर्थिक उदिष्टये साध्य करणे सोपे जाते:
प्रत्येक आर्थिक उध्दीष्ट साध्य करण्याचा राजमार्ग म्हणजे एसआयपी होय . घर घेणे, गाडी घेणे, मूलांचे शिक्षण आणि लग्न, निवृत्तीनंतर वेतन मिळण्यासाठी एसआयपी उत्तम पध्दत आहे . मासिक तीन हजार रुपयांची एसआयपी दहा वर्ष करून सरासरी १५ % परतावा मिळाला तर तुम्हाला आठ लाख चाळीस हजार मिळतात . यात चारचाकी गाडी सहज घेता येऊ शकेल . मासिक तीन हजार रुपयांची एसआयपी सव्वीस वर्ष करुन गुंतवणूकीवर सरासरी पंधरा टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला एक कोटी पंधरा लाख मिळतात .एवढया पैशात तुमच्या स्वप्नातील घर सहज घेता येईल
४ ) रुपयाच्या मूल्याची सरासरी होते :
आपण जास्त डोकं लावायचं काम नाही . फक्त गुंतवणूकीमध्ये सातत्य ठेवा . एकाच वेळी गुंतवणुक करण्यापेक्षा दर महिन्याला करा . त्यामुळे Rupee Cost Averaging होईल . ज्यांना शेअर बाजारातील चढउतार कळत नाही . पण त्याचा नफा मात्र घ्यायचा आहे .त्यांना एसआयपी चांगली आहे .एकाच वेळी खूप जास्त फंडात गुंतवणूक करणे टाळावे . दोन तीन निवडक फंडात विभागून गुंतवणूक करा . दीर्घकालावधी गुंतवणूकीतून मोठी रक्कम मिळवण्यासाठी डिव्हीडंड या पर्यायाऐवजी ग्रोथ ऑप्शन निवडा . वेळेला तुमच्यासाठी काम करू द्या . तुम्ही सावकाश आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचे ध्येय ठेवा . RT KaDum Strategy : Wealth Creation अर्थात संपत्ती निर्माण करण्यासाठी नियमीत गुंतवणूक करा . जितका तुमचा गुंतवणूक कालावधी जास्त असतो, तेवढाच धोका कमी आणि मिळणारा परतावा जास्त असतो .
५ ) थेंबे थेंबे तळे साचे :
मूठभर धान्य पेरल्यावर पोतं भरून उगवते . पोते भरून पेरल्यावर मोठे गोडाऊन भरून माल निघतो . सतत गुंतवणूक करा . कमी गुंतवणूकमधून जास्त फायदा घ्या. भांडवल सुरक्षित राहते . प्रत्येक महिन्याला गुंतवणूक रक्कम निश्चित .आपली मिळकत वर्षानुवर्ष वाढत जाते . म्हणून चार वर्षानंतर हजार रुपयांची गुंतवणूक किरकोळ वाटते .केलेल्या गुंतवणूकीचे मूल्य रोज बघणे टाळावे . कोणत्याही फंडात गुंतवणूक करताना त्याच्या मागील चार वर्षांच्या कामगिरीचा आढावा घ्या .एनएफओ मध्ये कधीच गुंतवणूक करू नका . सुरक्षित गुंतवणूक शोधण्यात वेळ फूकट घालवू नका .एफडी किंवा एनएससी सुरक्षित आहे परंतु त्यांचा परतावा महागाई दरापेक्षा जास्त नाही . मग अशा सुरक्षीत बचतीला गुंतवणूक का म्हणावे ? चला तर मग लवकरात लवकर गुंतवणूूकीला सुरूवात करा . ………रवीन्द्र टी कदम

हा लेख आवडला असेल तर माझ्या नावासहीत शेअर करा . मित्रांबरोबर चर्चा करा . इतर पुस्तके वाचा .सरकारी गुंतवणूक तज्ञाचा आवश्य सल्ला घ्या . मला प्रतिक्रिया जरुर कळवा . खाली शंका विचारा . अभ्यास करून उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्की करीन . धन्यवाद ! ! !
खूप छान आर्थिक मार्गदर्शन…
धन्यवाद राहुल