• ९६ ८९९ २५ ८७६
  • info@arthsamruddhi.in
logo
  • Home
  • About Us
  • Service
    • Stock Market
    • Mutual Fund
    • Insurance
    • Nutrilite Health and Wellness
    • Skin and Beauty Care
    • Enterprenuership
  • Blog
  • Books
  • Contact Us

Blog Elements

Home जीवन समृध्दी वाचन का करावे ?: राजकुमार आणि सिताताई मोरे

वाचन का करावे ?: राजकुमार आणि सिताताई मोरे

जीवन समृध्दी
Reading Books

📖 जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते Importance Of Book ?Reading : :

१) भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.

२) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते.

3) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो.

४) एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.

५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.

६) चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.

७) आई वडीलांची किंमत कळायला लागते.

८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो.

९) या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात.

१०) प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.

११) सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.

१२) कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खुप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते.

१३) या जगात १% चांगली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत. राहीलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होतात,
हे पण समजते.

१४) प्रोत्साहनामुळे हरलेला व्यक्ति जिंकु शकतो, हे समजायला लागते.

१५) हारल्यावर किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार पण मनात येत नाही.

१६) जिवन जगण्याची नवी उमेद, एक ऊर्जा निर्माण होते.

१७) आयुष्याच्या प्रति संवेदनशील भावना निर्माण होते.

१८) एकमेकांच्या सुख:दुःख ची तीव्रता कळते.

१९) करोडोची संपत्ती असणाऱ्या मध्ये गरिब तसेच दिवसाचे २००/- कमवणाऱ्यामध्ये श्रीमंत दिसायला लागतो…!

२०) आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर करण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं.

आपले,
राजकुमार व सीताताई मोरे

Tags: Reading Books
Previous Post समभाग संलग्न बचत योजना (Equity Link Savings Scheme):उदय पिंगळे
Next Post म्यूचुअल फंडांच्या योजनांचे नविन वर्गीकरण:उदय पिंगळे

Author

arthsamruddhi

Best selling Writer,Enterpreneuer,Publisher,Editor

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 All Rights Reserved. Developed By iDigitalConnect