• ९६ ८९९ २५ ८७६
  • info@arthsamruddhi.in
logo
  • Home
  • About Us
  • Service
    • Stock Market
    • Mutual Fund
    • Insurance
    • Nutrilite Health and Wellness
    • Skin and Beauty Care
    • Enterprenuership
  • Blog
  • Books
  • Contact Us

Blog Elements

Home म्युच्युअल फंड आता शेअर बाजारच्या अंगात वारं भरलयां, आन म्हणतयं तेजीत जोरात पळतूया :रविंद्र टी . कदम

आता शेअर बाजारच्या अंगात वारं भरलयां, आन म्हणतयं तेजीत जोरात पळतूया :रविंद्र टी . कदम

म्युच्युअल फंड, शेअर बाजार
Nifty50 Update
Nifty 50 Update
Stock Market

बऱ्याच दिवसांपासून शेअर बाजारात निफ्टी 11200 आणि 11800 च्या आडव्या पट्टयात झोका घेत होती . कोलांट्या उड्या खेळत होती . घटस्थापना झाली . दसरा आणि नवरात्रीचा उत्सव संपला . अमेरीकेचे मतदान झाले . शुक्रवारी सहा तारखेला निफ्टीने गॅप अॅपओपन केले .12025 ची रेजिस्टन्सलाइन तोडली .झोका तुटला . मंदीच्या फांद्या मोडून पडल्या .तीने आता जोरदार तेजीचा संकेत दिला आहे . ती आता लाइफ टाइम हाय देऊन देऊन रेकॉर्ड ब्रेक करणार आहे . शॉर्ट टर्ममध्ये तीचे टार्गेट 12430 तर मिडीअम टर्ममध्ये ती 12850 च्या आकाशाला गवसणी घालणार आहे . तीच्या अंगात आता तेजीचं वारं भरल्या आणि म्हणतीया तेजीत, जोरात पळतीया .झिंग झिंग झिंगाट ..

निफ्टीचा सपोर्ट 11750 आणि 11500 असणार आहे . ती 12850 च्या वरच्या तेजीच्या दिशेने सुसाट पळणार आहे . बँक निफ्टीचे टार्गेट 27200 आणि 29000 असणार आहे . बँक निफ्टीचा सपोर्ट झोन 24800 ते 23600 असू शकतो .

लवकरच वेळ मिळेल त्याप्रमाणे इंट्रा डे च्या हालचालीकडे लक्ष ठेवणार आहे . तर आमच्या अर्थसमृध्दी प्रकाशनचे अपडेट वाचायला विसरू नका .आमच्या वेबसाईटला रेग्यूलर भेट देण्यासाठी बुकमार्क करायला विसरू नका .

ज्यांनी मंदीत चिकाटीने एसआयपी सुरू ठेवली होती त्यांचे जास्त युनिट खरेदी झाले आहेत . तेजीमध्ये पुन्हा एकदा त्यांनी आनंदी होण्याचा काळ आला आहे .

टिप :

या ठिकाणी लिहीलेली माझी मते वैयक्तीक आहेत . तुम्ही तुमच्या अर्थसल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करा . हा माझ्या अभ्यासाचा भाग आहे . लेखक रविंद्र टी . कदम -पैशाचं झाड :मराठी शेअर बाजार गाईड

Tags: Nifty Update, SIP, Stock Market
Previous Post म्यूचुअल फंडांच्या योजनांचे नविन वर्गीकरण:उदय पिंगळे
Next Post 5 Books That changed My Life (… या पाच पुस्तकांनी माझे जीवन बदलले ) : रविंद्र टी . कदम

Author

arthsamruddhi

Best selling Writer,Enterpreneuer,Publisher,Editor

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 All Rights Reserved. Developed By iDigitalConnect