Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / म्युच्युअल फंड समभाग संलग्न बचत योजना (Equity Link Savings Scheme):उदय पिंगळे

समभाग संलग्न बचत योजना (Equity Link Savings Scheme):उदय पिंगळे

  November 2,2020

समभाग संलग्न बचत योजना (ELSS)

याविशेष प्रकारच्या गुंतवणूक योजना असून त्या म्यूचुअल फंडाच्या पुरस्कार्त्यांकडून राबवण्यात येतात .या योजना निरंतर (Open Ended) किंवा बंदिस्त (Closed Ended) या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत .यामधे एकरकमी किंवा जमेल तशी गुंतवणूक करता येते .त्याचप्रमाणे त्यात किमान ₹500/-आणि कमाल कितीही रकमेची नियोजनपूर्वक गुंतवणूकही (SIP) करता येते .यामधे केलेल्या गुंतवणुकीवर 80/C च्या विहित मर्यादेत सूट मिळते. लाभांश (Dividend) आणि मूल्यवृद्धी (Growth) हे दोन्ही पर्याय उपलब्ध असून या योजनेस लाभांश पुर्नगुंतवणूक (Dividend Reinvestment) हा पर्याय उपलब्ध नाही .या योजनेतीली 80% रक्कम ते अनुकरण करीत असलेल्या इंडेक्स मधील वैविद्यपूर्ण (Diversified) अशा समभागात जसे S&P nifty किंवा S& P nifty 500 या इंडेक्समधील समभाग आणि 20% रक्कम डेट , मनी मार्केटमधे गुंतवली जाते .(अधिक तपशिलासाठी योजनेचे मागणीपत्र पहावे)

सध्या मान्यताप्राप्त निवृत्तीयोजनेची वर्गणी (PF, VPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) ,सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) , विमा हप्ते , गृहकर्ज परतफेड ,शैक्षणिक फी , राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) , करबचत मुदत ठेवी (Tax Saving FDR) , सुकन्या समृद्धी योजना (SSY) , वरीष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) साधनातील गुंतवणुकीला दीड ते दोन लाख या मर्यादेत आयकर कलम 80/सी खाली आयकर सवलत मिळते .

यातील काही योजनांचा परतावा (Return) मिळतो तो योजनेच्या प्रकारानूसार करमुक्त असतो किंवा नसतो .त्याचप्रमाणे यातील बहूतेक योजनांचा गुंतवणूककाळ हा किमान पाच वर्षे तरी असतोच .पी एफ , व्ही पी एफ यांना सध्या 7.5 % करमुक्त उतारा मिळत असून त्यांचा गुंतवणूक कालावधी प्रदीर्घ आहे . पी पी एफ व एन एस सी मधून मिळणारा उतारा (Return) वार्षिक 7.8% आहे. यातील एन एस सी मधील पहिल्या 4वर्षात मिळालेले व्याज हे उत्पन्न करपात्र समजले जाते आणि त्याला पुनर्गुतवणूक केल्याचा फायदा मिळतो तर अंतिम वर्षात ती होत नसल्याने करपात्र उत्पन्नात मिळवले जाते .पी पी एफ मधील उत्पन्न करमुक्त परंतू यातील रक्कम पाच वर्षाहून अधिक काळ अडकून राहते . टॅक्स सेविंग एफ डी मधून पाच वर्षात मिळणारा उतारा 7ते 7.5% असून तो करपात्र आहे .एन पी एस मधून मिळणारा उतारा हा योजनेनुसार आणि दीर्घ काळ असून त्याची निश्चित अशी हमी नसल्याने ज्यांची दीड लाख गुंतवणूक पूर्ण झाली आहे आणि ज्यांच्याकडे जास्तीचे पैसे आहेत अशा लोकांना पन्नास हजारांची अधिकची करसवलत घेण्यास योग्य आहे .

एस एस वाई (सुकन्या समृद्धी) ही योजना मुलींनी स्वावलंबी व्हावे यासाठी असून त्यातील गुंतवणूक मुलीच्या वयानुसार 14 ते 21वर्षपर्यंत अडकून राहते आणि ती संबधित मुलीलाच मिळते .सध्या यातून मिळणारा परतावा 8.3% असून तो करमुक्त आहे . तर एस सी एस एसही योजना सेवानिवृत्त झालेल्या लोकांसाठी असून यातून दर तीमाहीस मिळणारे 8.3% व्याज करपात्र आहे .ही गुंतवणुक पाच वर्ष कालावधीसाठी आहे .

SIP
https://www.fundzbazar.com/customisedlinkregistration-7C7723-2364257C77232D67212F612A7C7723246C3C7C77232D6721
https://nivesh.app.link/Xedk8j40J7

या सर्व योजनांच्या तुलनेत ई एल एस एस ही कोणतीही निश्चित हमी न देणारी योजना आहे . भविष्यात भांडवल उभारणी करण्यासाठी जोखिम स्वीकारण्याची तयारी असलेल्या प्रत्येकास उपयुक्त आहे .या योजनेचा किमान गुंतवणूक कालावधी तीन वर्ष असून हा कालावधी संपला तरी गुंतवणूक काढून घेण्याचे बंधन नसते .यावर मिळणारा डीवीडेंड त्याचप्रमाणे भांडवली नफा हा पूर्णपणे करमूक्त आहे . moneycontrol चे संकेतस्थळावर 26 ऑक्टो 2017 रोजी उपलब्ध असलेल्या माहीती प्रमाणे मूल्यांकनानूसार (Top Ranking Scheme) एल अॅड टी टेक्स अँडव्हाटेंज ही योजना प्रथम स्थानावर असून त्याचा मागील वर्षाचा परतावा 25% तर मागील तीन वर्षाचा सरासरी परतावा 17.8% आहे .येथेच उपलब्ध योजनांचे कामगिरीनुसार (Top Performing Scheme) एस बी आई टॅक्स अँडव्हांटेज स्कीम 2 ,रिलायंस टॅक्स सेवर फंड , आई सी आई सी आई प्रू राइट फंड , अॅक्सीस लॉग टर्म ईक्विटी फंड , प्रिन्सिपल टॅक्स सेविंग यातून मिळालेला गेल्या पाच वर्षाचा सरासरी परतावा 22% हून आधिक आहे .

या योजनांत गुंतवणूक करतांना निश्चितच धोका आहे परंतू यातून मिळणारा परतावा पाहिला असता थोडी जोखिम (Calculated Risk) पत्करली तर अल्पमुदतीत अधिक आकर्षक उतारा भांडवलवृधी होण्याची खात्री आहे आणि त्यासाठी अनेक फंड हाउस कडील आकर्षक योजनांचा पर्याय उपलब्ध आहे .याशिवाय थोडे थांबण्याची तयारी असेल तर नुकसान होण्याची अजिबात शक्यता नाही .हा दृष्टीकोन ठेवून अशा योजनांचा विचार धाडसी गुंतवणुकदारांनी करावा .

(यात उल्लेख केलेल्या योजना संदर्भासाठी www.moneycontrol.com या संकेतस्थळावरून घेतल्या असून त्या केवळ अभ्यासासाठी आहेत , त्यांची शिफारस केलेली नाही. आपण आपली गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून योजना समजून घेवून स्वतःचे जोखमीवर करावी)

https://amzn.to/35XEm7B

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://amzn.to/2TMZQ1f

https://amzn.to/3mMi67v

Tags : ,