Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / म्युच्युअल फंड : उद्या भविष्यात सेन्सेक्स एक लाख होणार आहे . समजून घ्या महत्वाची पाच कारणे

: उद्या भविष्यात सेन्सेक्स एक लाख होणार आहे . समजून घ्या महत्वाची पाच कारणे

  May 30,2021

१ ) वॉरन बफे इंडिकेटर :

सन दोन हजार चोवीस रोजी सरकारी धोरणानुसार भारताचा जीडीपी पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर होईल असे ध्येय ठरले आहे . भारत हा सर्वात मोठा तरूणांचा देश आहे . सरकार बदलू शकते .सरकारची धोरणे बदलू शकतात परंतु तरूणांची ऊर्जा मात्र कायम असणार आहे . वॉरन बफे इंडिकेटर मार्केट कॅपिटल आणि जीडीपी यावर आधारित आहे . मार्केट कॅपिटल आणि जिडीपी यांचा रेशो 115 टक्के आला . जिडीपी 2025 साली 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर आली तर सेन्सेक्स एक लाख 16 हजार 751 होऊ शकतो .

२ ) 72 चा नियम

एखादी रक्कम गुंतवल्यानंतर किती वर्षात दामदुप्पट होते हे 72 च्या नियमानुसार कळते . तुम्हाला किती टक्के दराने परतावा मिळाला या परताव्याच्या दराने 72 ला भागल्यावर जे उत्तर येते ते म्हणजे गुंतवणूक डबल होण्याचा कालावधी असतो . भारतामध्ये गेल्या तीन दशकांत शेअर बाजाराने सरासरी 14 टक्के परतावा दिला आहे . 72 ला 14 ने भागले तर पाच वर्षे कालावधी असे उत्तर येते म्हणून 14 टक्के दराने सेन्सेक्स 2026 साली 100000 होईल आणि 18 टक्के दराने आज पासून फक्त चार वर्षात सेन्सेक्स डबल होईल .
Open Demat
https://upstox.com/open-account/?f=Y0RE

3) लोकसंख्या

लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे . भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे .भारत हा सर्वात मोठा ग्राहकांचा देश आहे .म्हणून ॲमेझॉन पासून गुगल पर्यंत सर्वजण गुंतवणुकीच्या संधी शोधत आहेत .

4) जीवनशैलीत सुधारणा

भारतात स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उत्पन्न घेत आहेत . भारतात उत्पन्न आणि खर्च या दोघांमध्ये वाढ झाली आहे . जीवनशैली सुधारली आहे . त्याच्यामुळे खर्च करण्याची प्रवृत्ती वाढली आहे .भारत हा तरुणांचा देश आहे .भारतात एकूण 29 वर्षे वय असणाऱ्या तरुणांची संख्या जगात सर्वात जास्त आहे .

5) जीडीपीच्या दरात सुधारणा

आयएम एफच्या अंदाजानुसार जीडीपी वाढीचा दर हा सन दोन हजार बावीस मध्ये 11.5 टक्के असणार आहे . जिडीपी नुसार भारत जगात सहाव्या क्रमांकावर आहे . सन 2030 साली भारत जगातील तिसरी मोठी महासत्ता होईल .Start SIP HERE
https://www.assetplus.in/mfd/ravindratkadam

Tags : ,