Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / शेअर बाजार प्रत्येक सि.ए.शेअर बाजारातून श्रीमंत का होत नाही ?:रविंद्र टी. कदम

प्रत्येक सि.ए.शेअर बाजारातून श्रीमंत का होत नाही ?:रविंद्र टी. कदम

  October 18,2020

अकाउंटींग आणि फायनान्स यामध्ये फरक आहे . जिथे अकाउंटिंग संपते , तेथून पुढे फायनान्स सुरु होते . अकाउंटिंगमध्ये बॅलन्स शिटमधील मालमत्ता आणि ऋण , नफा – तोटा पत्रक यातील आकड्यांचा संबंध येतो . यामध्ये भूतकाळातील इतिहास असतो. अकाउंटींग म्हणजे हिशोबाची माहीती जमा करणं, त्यांची नोंद करणे, आणि ठरावीक नमुन्यात ती माहीती सादर करण होय. अकाउंटींग हे कारकुनी काम असते . फायनान्स हे बौध्दीक काम असतं . अकाउंटींग करणारा नॉन -फायनान्स व्यक्ती असतों . तो व्यवसायास नफा कमवून देत नसतो . कारण घडून गेलेल्या घटनेची नोंद करणे एवढेच त्याचे काम असते .पर्सनल फायनान्समध्ये रिटायरमेंट प्लॅनींग , इन्सुरन्य प्लॅनींग , इस्टेट प्लॅनिंग , टॅक्स प्लॅनींग , इनव्हेस्टमेंट प्लॅनींग उदा . म्यूच्यूअल फंड ‘ शेअर बाजार वगैरे भाग येतो . आपल्या निर्णयाचा व्यवसाय किंवा घरगुती जीवनात भविष्यातील नफ्यावर काय परिणाम होईल हे समजणं म्हणजे फायनान्स असते . स्वतःचे आर्थिक भविष्य लक्षात घेऊन महागाईच्या दरावर मात करण्यासाठी पैशाला कामाला लावणारा माणूस फायनान्सीयल असतों. अकाउंटिंगचे काम करणारा जमाखर्चाचे हिशेब लिहीणारा कारकून असतो . चार ठिकाणी चौकशी करून भाजी खरेदी करणारी आमची ताई फायनान्सीअल काम करते . कारण तिच्या निर्णयाचा परिणाम भविष्यावर होणार असतो …. तुम्ही स्वतःला जमाखर्च लिहीणारे कारकून का समजता ? तुम्ही उत्पन्न मिळवता म्हणून तुम्हाला आर्थिक भविष्य समजू शकते . म्हणून तुम्ही शेअर बाजारातून श्रीमंत व्हाल , परंतु प्रत्येक सि. ए . होणार नाही . चांगली वस्तू किंवा सेवा देण म्हणजे पैसा असे नेपोलियन हिलने ‘थिंक अँड ग्रो रिच‘ पुस्तकात म्हटले आहे .नफा म्हणजे खर्च वजा जाऊन आलेलं उत्पन्न आसतो. ज्या गोष्टीने तुमाला नफा मिळेल अशी मालमत्ता (Asset) खरेदी करण्यासाठी कर्ज काढा,असं आस्तिकशिरोमणी चार्वाक म्हणतात. पैसा हे विनिमयाचे (Medium of Exchange ) साधन आहे .पैशात व्हॅल्यू साठवतात. पैशानं सेवा मोजतात. साधन कमवायचा प्रयत्न का करता? ,नफा कमवा .

Tags : ,