Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / म्युच्युअल फंड फायनान्सिअल प्लानर कशासाठी ? चार कारणे

फायनान्सिअल प्लानर कशासाठी ? चार कारणे

  May 28,2021

1)आपल्याकडे आर्थिक साक्षरता कमी असते त्यावेळी

आपण बचत चांगली करतो परंतु महागाईच्या दरावर मात करणारे गुंतवणूक साधन निवडत नाही.योग्य असेट अलोकेशन आणि डायवरसिफीकेशनसाठी तज्ञाची गरज असते.अनेक लोकांना गुंतवणूक कालावधी,रिस्क,योग्य परतावा आणि कर यांचा मेळ लक्षात येत नाही.गुंतवणूक तज्ञाकडे क्लायेंटच्या गरजा आणि साधने यांचा अभ्यास असतो.म्युच्युअल फंडाबाबत आर्थिक साक्षरतेसाठी मोफत ई-बुक ताबडतोब मिळवण्यासाठी पुढील लिंकवर साईन इन करा http://www.assetplus.in/partner/ravindratkadam

2)आर्थिक नियोजनकार तज्ञ वैद्यप्रमाणे असतो

मला अनेकजण विचारतात की चांगल्या फंडाचे नाव सांगा . तुम्ही कोणते रेशो वापरले किंवा युक्त्या वापरल्या हे कोणच विचारत नाही . काही जणांना माझ्याकडून चांगले नाव काढून घेऊन डायरेक्ट खरेदी करायची असते . मित्रांनो चार बाळांना ताप असेल तर सर्वांना सारखे औषध चालणार नाही . मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, सारी किंवा कोविड 19 (कोरोना ) अशा अनेक आजारांमध्ये ताप असतो . म्हणून प्रत्येकाला समान ट्रिटमेंट देऊन जमत नाही . प्रत्येक माणसाच्या आर्थिक गरजा वेगळ्या असतात . गरजेनुसार स्कीमचे प्रकार आणि उपप्रकार बदलतात .डायरेक्ट कंपनीच्या वेबसाइटवरून फंड खरेदी केला तर तुम्हाला अर्धा टक्का जादा नफा मिळतो . तीच खरेदी तुम्ही अॅडव्हायजर मार्फत केली तर टोटल पोर्टफोलिओमध्ये सुमारे पाच – सहा टक्के जादा नफा मिळू शकतो . अनेकजण अभ्यास चांगला झाला असे मानून फक्त भुतकाळात किती टक्के नफा मिळाला हे पाहून डायरेक्ट खरेदी करतात .भूतकाळ महत्त्वाचा आहे हे मान्य आहे परंतु त्यासोबत स्टँडर्ड डेव्हीएशन, शार्प रेशो, अल्फा, बीटा, ट्रॅकींग एरर अशा प्रकारची तीसपेक्षा जास्त विविध तंत्रे आणि युक्त्या वापरून भारतातील 45 AMC X 35 प्रकार आणि उपप्रकार = 1535 स्कीम यांचा अभ्यास कधी करणार ? तुमच्यावतीने फायनान्सील अॅडव्हायजर अभ्यास करत असेल तर सेवा घ्यायला काय हरकत आहे ? सुमारे तीसपेक्षा जास्त पध्दती आणि तंत्रे वापरून अॅडव्हायजर फंड निवडतात .

3)आर्थिक नियोजनकार दीर्घकाळ फायद्याचा

अॅडव्हायजर ठरावीक काळानंतर फंड Review किंवा Rebalancing करतात . त्यामूळे अजून दोन टक्के नफ्याची भर पडू शकते . पोर्टफोलिओ ट्रॅकींग नाही केला तर लॉस होऊ शकतो . तुमचा अभ्यास खूप चांगला असेल तर डायरेक्ट प्लॅन निवडा . तुम्ही अभ्यास नाही म्हणून डॉक्टर, वकील, इंजिनीअर आणि सीए यांना फी खर्च करून सेवा घेत असाल तर फायनान्सीअल सेवेसाठी फी का देऊ नये ? वेळ आणि श्रम वाचवून दुसऱ्याच्या ज्ञानाचा फायदा घ्यायचा असेल तर फंडाचा रेग्यूलर प्लॅन निवडा .तुमच्यासाठी अर्थसमृध्दी प्रकाशन आणि प्रुडंट कॉर्पोरेट अभ्यास करून स्कीम नीवडण्यास मदत करतील . अॅसेट अलोकेशन, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट , वेल्थ क्रीएशन , वेल्थ प्रोटेक्शन यासाठी आवश्य भेटा www.arthsamruddhi.in आणि एसआयपी सुरू करण्यासाठी ऑनलाइन खाते उघडा http://www.assetplus.in/partner/ravindratkadam

4) अर्थिक नियोजनकार कसा असावा ?

तो गुतंवणूक साधने खपवणारा नसावा.तो सोलुशन प्रोव्हायडर असावा.तो तुमची माहिती गुप्त ठेवणारा असावा.
डीम्याट खाते उघडण्यासाठी पुढील लिंकमध्ये माहिती भरा https://upstox.com/open-account/?f=Y0RE

Tags : ,