Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / म्युच्युअल फंड या 7 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी समजल्याशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करू नका ….जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

या 7 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी समजल्याशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करू नका ….जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

  April 23,2021

Half Knowledge is More Dangerous
अर्धे ज्ञान धोकादायक असते हे शेअर बाजारात सत्य आहे.
Higher The Knowledge
Lower The Risk
Higher The Returns

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी सात मूलभूत गोष्टी समजून घ्या : मित्रांनो, शेअर बाजारात हात पोळून घेतले आहेत. लय सालटे निघाले आहे . तुमच्या जवळच्या जीवलग मित्राचे शेअर बाजारात दिवाळे वाजले आहे . शेअर बाजार हा जुगार वाटू लागला आहे . शेअर बाजारात उतरण्याची भीती वाटू लागले आहे . हे खर आहे ना ? तर शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात रिस्क आहे परंतु तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी समजल्या तर यामध्ये प्रचंड फायदा होऊ शकतो . तुम्हाला या सात गोष्टी समजल्या तर तुम्ही निर्भय व्हाल . म्हणून या सात गोष्टी समजून घेतल्याशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करू नका .

1) शेअर बाजार एका रात्रीत झटपट श्रीमंत होण्याची जागा नाही .

शेअर बाजार म्हणजे जादूची छडी नाही . शेअर बाजार म्हणजे पी हळद आणि हो गोरी अशी परिस्थिती नाही . शेअर घेणे म्हणजे उद्योगाचा भागीदार होणे .शेअरचे प्रमाणपत्र म्हणजे लॉटरीचे तिकीट नसून तो मालमत्तेचा तुकडा आहे असे वॉरन बफे म्हणतात . शेअर बाजारांमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केली तर दोन आकडी चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो . उदाहरणार्थ . उदाहरणार्थ राम आणि श्याम हे दोन मित्र आहेत .दोघांचे वय समान आहे . दोघांनी समान गुंतवणूक केली . दोघांनी एकाच वेळी गुंतवणूक केल्यास सुरुवात केली, परंतु रामने 35 वर्षे गुंतवणूक केली आणि श्यामने पंचविसाव्या वर्षी गुंतवणूक करण्याचे थांबवले . समजा दोघांनी दहा लाख रुपये गुंतवले आहेत . त्यांना फक्त दहा टक्के चक्रवाढ व्याजाने नफा झाला आहे .अशा वेळी रामला दोन कोटी 80 लाख रुपये मिळाले तर श्यामला एक कोटी दहा लाख रुपये मिळाले .रामने फक्त दहा वर्षे जादा गुंतवणूक केली म्हणून त्याला श्यामच्या दुप्पट नफा मिळाला . ही चक्रवाढ व्याजाचे ताकद आहे .ही चक्रवाढ व्याजाची जादू आहे .दीर्घ काळामध्ये शेअर बाजारातील गुंतवणूक ही रियल इस्टेट, सोन, चांदी या सर्वांपेक्षा जास्त नफा मिळवून देते.

2) गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग करा .(GBI )

Goal Based Investing
थोडक्यात आर्थिक ध्येयातनुसार गुंतवणूक करा . शॉर्ट टर्म आणि लाँग
टर्म मध्ये तुमच्या आर्थिक ध्येयाची
विभागणी करा .उदाहरणार्थ लॉंग टर्म ध्येय .. रिटायरमेंट ,मुलांचे शिक्षण आणि लग्न तर शॉर्ट टर्म
मध्ये ध्येय कार गाडी घेणे, परदेशी
प्रवास करणे इत्यादीचा समावेश होतो . जी बी आय मुळे तुमचे इस्टिमेट तयार होते . 2,5 ,10 वर्षाची
जीबीआयमुळे आर्थिक नियोजनच तयार होते .
परंतु जीबीआईचा व्यवहारात उपयोग कसा करावा ?याचे उत्तर आहे अॅसेट अॅलोकेशन . याच्या माध्यमातून आपण पैशाची विभागणी वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारांमध्ये करत असतो . इक्विटी, डेट, गोल्ड हे महत्त्वाचे प्रकार आहेत . लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करताना इक्वीटी मध्ये जास्त गुंतवणूक करावी असा सर्वसामान्य नियम आहे .शॉर्ट टर्म चे पैसे तुम्ही डेट मध्ये टाकू शकता . जर तुमच्याजवळ एक लाख रुपये असतील तर इक्विटी आणि डेट मध्ये विभागणी कशी कराल ? जर तुमचे आर्थिक ध्येय 15 वर्षाच्या असतील तर 80 हजार रुपये इक्विटी आणि इतर वीस हजार रुपये डेट मध्ये ठेवावेत .

3)स्टॉक मार्केट ऋण काढून सण करण्याची जागा नाही .

कर्ज काढून गुंतवणूक करण्याची सर्वात मोठी चूक नवीन गुंतवणूकदार करतात .या ठिकाणी तुमच्या अंदाजानुसार सर्व खरे ठरेल याची गॅरंटी नाही . शेअर बाजारातील नफा बाजाराच्या चढ उतारावर अवलंबून असतो. शॉर्ट टर्म मध्ये शेअरबाजार होलाटाईल असतो . त्यामध्ये प्रचंड प्रमाणात चढ-उतार असतो . आपण मार्च एप्रिल 2020 मध्ये कोरनाच्या पहिल्या लाटेत याचा अनुभव घेतला आहे . बाजार दोन आठवड्यांमध्ये 38 टक्के कोसळला होता . अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या आणि रोजगार गेले आहेत . तुम्हाला बँकेचे व्याज माफ होत नाही .तुमच्यावर आर्थिक आणि भावनिक दडपण येते .म्हणून आधी बचत करा आणि नंतर गुंतवणूक करा .माझ्या अनुभवात कोरोनाच्या काळात कर्ज काढून ट्रेडिंग करणारी माणसे नुकसानीमध्ये गेले आहेत . जॉब गेल्याचे अजून त्यावर जास्त टेंशन होते . जॉब पण गेला आणि टेन्शनमध्ये नुकसान पण झाले . म्हणून कर्ज काढून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करू नका .

4) शेअर बाजारात वेळ साधू नका तर शेअर बाजार ला वेळ द्या .

Dont Time The Market
एक कांदा उत्पादक शेतकरी आहे .तो सलग दहा वर्षापासून दरवर्षी एक एकर कांदा पिकवतो . दराचा चढ-उतार आहे त्याचा सरासरीमुळे फायदा घेतो . दुसरा एक शेतकरी कांद्याला चांगला दर मिळाला तर तर दुसर्‍या वर्षी तो एकाच वेळी दहा एकर कांदा करतो आणि नेमका पुढच्या वर्षी दर उतरतो आणि त्याला नुकसान होते .ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांने दहा वर्षे वेळ दिला, तो सरासरी मध्ये नफ्यात राहिला आणि ज्या शेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल म्हणून वेळ साधण्याचा प्रयत्न केला तो नुकसानी मध्ये राहिला . शेअर बाजारातसुध्दा कोरोनाच्या काळात घाबरून अनेकांनी विक्री केली .परंतु ज्यांनी एसआयपी केले होती . नियमित गुंतवणूक केली होती . ते सर्वजण आजही सरासरीमूळे नफ्यामध्ये आहेत .बाजारामध्ये वेळ साधन्यापेक्षा बाजारला जास्त वेळ द्या .म्हणजे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा नफा होईल .

5) शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचे विविध प्रकार आहेत .

शेअर बाजारांमध्ये डायरेक्ट किंवा म्युच्युअल फंडामार्फत गुंतवणूक करता येते .डायरेक्ट गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ची गरज असते . तुमच्याकडे भरपूर वेळ ,ज्ञान आणि कौशल्य असेल तर शेअर बाजारात डायरेक्ट शेअर खरेदी करा .कंपनीचे मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडामार्फत गुंतवणूक करा. त्यामध्ये जास्त नफा होतो . म्युच्युअल फंडामध्ये मॅनेजर मार्फत हजारो लोकांचा फंड गोळा करून एकत्रित गुंतवणूक केली जाते .मॅनेजर हे प्रोफेशनल असतात आणि आपल्याला नफा मिळवून देतात . म्यूच्यूअल फंडाच्या कंपनीला ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असे म्हणतात .HDFC, ICICI , SBI आणि इतर बेचाळीस अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या भारतात आहेत .

6) रिस्क कमी करण्यासाठी एका टोपलीत सगळे अंडी ठेवू नका .

Diversify Your Portfolio To Minimise The Risk
चार पैसे जास्त नफा मिळाल्यावर सगळेच पैसे शेअर बाजारात गुंतवण्याची आपली भावना तयार होते .परंतु शेअर बाजार शॉर्ट टर्ममध्ये होलाटाईल असतो . कधी कधी तुमची सहनशीलता संपते . आत्मविश्वास कमी होतो . तेल पण गेले तूप पण गेले आणि तुमच्या हाती धुपाटणे आले अशी तुमची अवस्था होऊ शकते . म्हणून एकाच टोपल्यात सगळी अंडी ठेवायचे नसतात . एका मालमत्तेचे नुकसान झाले तर दुसरीकडे तुम्हाला फायदा झाला पाहिजे . मार्च 2020 मध्ये covid-19 ची घटना घडली . बाजार 38% कोसळला . फक्त दोन आठवड्यामध्ये या वेगाने घटना घडल्या . अशावेळी ज्यांनी आपला नफा लिक्विड मध्ये ठेवलेला होता ,त्यांचे संरक्षण झाले. पेपर अॅसेट, रियल इस्टेट ,गोल्ड असे मालमत्तेचे विविध प्रकार आहेत .पेपर अॅसेटमध्ये सुद्धा इक्विटी, डेट असे प्रकार आहेत.असेट अलोकेशन करा.इमर्जन्सी फंड बाजूला ठेवा.डोळस गुंतवणूक करा.

7) शेअर बाजारातून योग्य आणि रीजनेबल नफ्याची अपेक्षा ठेवा.

शेअर बाजारने दीर्घकाळ गुंतवणूकदारांना दोन आकडी चक्रवाढव्याज नफा दिला आहे . दिर्घकाळामध्ये 15 टक्‍क्‍यांपेक्षा जादा नफा चक्रवाढ व्याजाने मिळाला आहे .फक्त बारा टक्के चक्रवाढ व्याजाने पाच वर्षात आपली रक्कम 1.7 पट होऊ शकते . शेअर बाजारा कडून आपण योग्य नफा याची अपेक्षा केली पाहिजे . सुमारे पंधरा वर्षांमध्ये रियल इस्टेटमध्ये चक्रवाढ व्याजाने 12 टक्के व्याजाने नफा मिळू शकतो तर शेअर बाजारांमध्ये 15 ते 20 टक्के चक्रवाढ व्याजाने नफा होऊ शकतो . दिर्घ काळामध्ये सोन आणि रिअल इस्टेट यांच्यापेक्षा शेअर बाजारातच जास्त नफा मिळतो .

रविन्द्र टी कदम

Tags : ,