Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / जीवन समृध्दी 16 Powerful Ayurvedic Herbs and Spices With Health Benefits (16 आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि फायदे)

16 Powerful Ayurvedic Herbs and Spices With Health Benefits (16 आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि फायदे)

  February 6,2021

1)आश्वगंधा Ashwagandha

अश्वगंधा हे भारत व दक्षिण आफ्रिका येथे सापडणारे प्रसिद्ध आयुर्वेदिक औषध आहे. यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते. ताण तणाव कमी होतो .चांगली झोप लागते. रक्तातील शुगर कमी होते. स्मरणशक्ती वाढते. स्नायूंची ताकद वाढते . पुरुषांची सेक्स पावर वाढते.

2) बोस्वेलिया Boswellia

मध्ये ग्लूकोसामाईन हे इन्ग्रेडियंट असते .त्याचा उपयोग सांधेदुखीवर होतो . बोस्वेलिया मुळे पचनक्षमता सुधारते . दीर्घकालीन आस्थमा असणाऱ्यांची श्वसनक्षमता वाढवते . या वनस्पतीमुळे सूज कमी होते .

3,4,5 ) आवळा, बिभीटाकी आणि हारीटाकी Triphala

या तिघांना मिळून आयुर्वेदामध्ये त्रिफळा असे म्हणतात .यांच्यामुळे पचनक्रिया सुधारते .मोठ्या आतड्याच्या आरोग्याला मदत होते .तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर तो कमी होतो . सांधेदुखीसाठी गुणकारी आहे . तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते .कोलेस्टेरॉल वाढले असेल तर त्रिफळा खावा.लिव्हर म्हणजे यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी त्रिफळा चांगला आहे

6) ब्राम्ही Brahmi

 

वेदनाशामक आहे .सूज कमी करते.ब्राम्हीमुळे मनाची एकाग्रता वाढते. बौद्धीक क्षमता सुधारते. मध्यवर्ती मज्जासंस्थेचे कार्य सुधारते .ब्राम्हीमुळे स्मरणशक्ती वाढते .ताणतणाव कमी होतो .मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते .ब्राम्हीमूळे ADHD लक्षणे कमी होण्यास बरीच मदत होते .दररोज डोकेदुखीचा त्रास असेल तर ब्राम्ही चांगली आहे .चांगली झोप येत नसेल तर ब्राह्मी .

7) Cumin म्हणजे जिरे .

जिरे हे मसाल्याच्या पदार्थामध्ये असणारे आयुर्वेदीक औषध आहे .यामुळे अन्नाचा स्वाद वाढतो . उदाहरणार्थ .जीरा राईस .आपली पचनक्रिया सुधारते .गॅस आणि वात या समस्या दूर होतात . बद्धकोष्ठतेवर गुणकारी आहे . पिंपल्स व काळे डाग जाण्यासाठी याचा फायदा होतो .या मधून ई विटामिन मिळते .याचा मधुमेह नियंत्रणासाठी फायदा होतो .

8) टर्मरिक Turmeric

म्हणजे हळद होय .हळद हा मसाल्याचा पदार्थ आहे . हळदीमध्ये कुरकुमीन हा प्रमुख घटक असतो .त्यामुळे हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारते . हळद हे खूप चांगले एंटीऑक्सीडेंट आहे . हळद ही anti-inflammatory आहे . म्हणून त्याच्यामुळे सूज आणि दाह कमी होतात .

9) ज्येष्ठमध Licorice root

अँटी व्हायरल आहे . शरीरातील खोकला बंद होतो आणि कोविड 19 साठी चांगले आहे. हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.वसाका,जेष्ठमध आणि सुरसा यांच्यामुळे कफ कमी होतो . वेदना शामक असल्यामुळे श्वसनाला पण आराम मिळतो . एंटीऑक्सीडेंट चांगले आहे म्हणून रोगप्रतिकारक शक्ती सुधारते .Licorice रूट म्हणजे जेष्ठमध .ज्येष्ठमध मुळे सूज कमी होते आणि व्हायरल इन्फेक्शन कमी होते . पचनक्षमता सुधारते आणि त्वचेचा दाह कमी होतो.

10) गोटू कोला Gotu Kola

ब्राम्हीसारखी वनस्पती आहे परंतु हीचे ओरिजिन अमेरिका आहे आणि ब्राह्मी ही आपल्या भारता मधली आहे .दोन्ही चे उपयोग जवळजवळ सारखेच आहेत परंतु त्यांचे गुणधर्म आणि बॉटनिकल नेम मध्ये वगैरे फरक आहे . ब्राम्ही आणि गोटूकोला यांचे उपयोग जरी समान असले तरी त्यांच्यामध्ये फरक आहे . त्यांच्या डोस मध्ये फरक असू शकतो . तुम्ही यांचा उपयोग करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या .

11,12,13 ) कोरोनाचे पेशंटसाठी वसाका, मूलेठी(ज्येष्ठमध) आणि सुरसा

Vasaka,Mulethi,Surasa चांगले आहे .रेस्पिरेटरी केअरसाठी व्यवस्थित आहे.

14,15,16 ) मधुनाशिनी,शून्ठी आणि त्वक

Madhunashini,shunti and Twak या वनस्पतीमुळे रक्तामधील शुगर कमी होते.

 

संकलन : रविंद्र टी कदम

टिप: आयुर्वेदिक औषध सुरक्षितअसते.त्याचे साईड इफेक्ट नसतात.लहानमुले,गर्भवती स्त्रीया आणि पुरुष यांचा डोस वेगवेगळा असू शकतो.म्हणून तुम्ही तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे.

Tags : ,