Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / म्युच्युअल फंड म्यूचुअल फंडांच्या योजनांचे नविन वर्गीकरण:उदय पिंगळे

म्यूचुअल फंडांच्या योजनांचे नविन वर्गीकरण:उदय पिंगळे

  November 5,2020

म्यूचुअल फंडांच्या विविध योजना , त्याच्या गुंतवणूक कालावधीवरून ओपन एंडेड आणि क्लोस्ड एंडेड अश्या दोन प्रकारांत आहेत .गुंतवणूक साधनांवरून ईक्विटी , डेट , हायब्रीड आणि मनी मार्केट फंड या चार प्रकारात आहेत .उत्पन्न विभागणी वरून डीवीडेंड आणि ग्रॉथ या दोन प्रकारात तर ई ल एस एस , पेन्शन या सारख्या योजना इतर विशेष प्रकारच्या योजना अशा प्रकारात विभागल्या आहेत . बाजारात 42 म्यूचुअल फंड हाउसनी अश्या प्रकारच्या 2000 हून अधिक योजना बाजारात आणल्या असून त्यांना आकर्षक नावेही दिली आहेत . यामुळे गुंतवणुकदारांना निश्चित अर्थबोध होत नाही त्यामुळे गुंतवणुक निर्णय घेण्यात गोंधळ होवू शकतो .सप्टेंबर 2017 अखेर सर्व योजनांतील एकत्रित गुंतवणूक 20.4 अब्ज एवढी आहे .

यामुळे बाजारात विविध योजनांची भाऊगर्दी झाली असून एका फंड हाउस कडून एकाच प्रकारच्या अनेक योजना बाजारात आल्याने सामान्य गुंतवणूकदाराच्या मनात गोंधळ उडाला आहे .यावर उपाययोजना म्हणून 6ऑक्टोबर 2017 रोजी सेबीने सर्व फंड हाउसना एक परिपत्रक पाठवून त्यांच्याकडील सर्व निरंतर योजनांची (open ended scheme) विभागणी पाच प्रकारांत करण्यास सूचवले आहे . त्यांचे ठळक उपप्रकारही सूचवले आहेत .

सेबीनी म्यूचुयल फंडाना त्यांच्या योजनांची त्यांच्या गुंतवणूक साधनावरून :

१.डेट स्कीम :

कर्जरोखे , बॉन्ड , कमर्शियल पेपर यातील गुंतवणूकीच्या या योजना असून त्यांचे 1)Overnght 2)Liquid 3)Ultra short duration 4)Low duration 5)Money market 6)Short duration 7)Medium duration 8)Miedium to long duration 9)Long duration 10)Dynamic bond 11)Corporate bond 12)Credit risk fund 13)Banking &PSU 14)Gilt 15)Gilt with 10-year duration 16)Floater हे उपप्रकार सूचवले आहेत .

२.ईक्विटी स्किम :

फक्त समभागाशी संबधित या योजना असून यांचे 1)Multi cap 2)Large cap 3)Large & midcap 4)Midcap 5)Small cap 6)Dividend yield 7)Value 8)Contra 9)Focused 10)Sectoral themes -ELSS असे उपप्रकार सूचवले आहेत .

३. हायब्रीड फंड :

यामधे समभाग आणि रोखे या दोन्हीचाही सामावेश असेल .यांचे 1)Conservative 2)Balanced 3)Aggressive 4)Dynamic asset allocation 5)Malti asset allocation 6)Arbitrage

 

४. सोल्युशन ऑरियेंटेड :

यामधे एखादा ऊद्धेश ठेवून गुंतवणूक केली जाईल .जसे 1) Retirement 2)Children benefit

५.इतर प्रकारच्या योजना: वरील निकषात न बसणाऱ्या योजना

1)Index fund / ETF 2)FOF -Funds of funds -overseas/domestic

अश्या पाच विभागात वर्गीकरण करण्यास सूचवले असून त्याचे 36 उपप्रकार सूचवले आहेत .यामधे इक्विटी योजना ज्यामुळे ही गुंतवणूक कोणत्या ठळक प्रकारांत आहे ते अधिक स्पष्ट होईल . उदाहरणार्थ डीवीडेंड यील्ड ईक्विटी फंड यातील गुंतवणूक ही फक्त जेथे अधिक लाभांश उतारा मिळेल अशाच समभागात (Specific to)केली जाईल तर बँकिंग अँड पी एस यू डेट फंड ह्या फंडातील गुंतवणूक बँक आणि पी एस यू चे कमर्शीअल पेपरमधे केली जाईल .जरी हे उपप्रकार विविध 36 प्रकारात विभागले असले तरी त्यातून निश्चित अर्थबोध होईल .सोल्युशन ऑरियेंट योजनांचा नेमका गुंतवणूक कालावधी किती असावा ते ठरवावे लागेल .तसेच कंपनीचे मार्केट कॅपिटलायजेशन वरून पहिल्या 100 म्हणजे लार्ज कॅप , 101ते 250 वरून मिड कॅप आणि 251 पुढील सर्व स्मॉल कॅप असे ठरवावे आणि त्यातच गुंतवणूक करावी लागेल आणि समजा जर योजना स्मोल कॅप असेल तर 80% रक्कम नव्याने तयार केलेल्या स्मॉल कॅपमधे करावी लागेल .एका फंड हाउसची एका उपप्रकाराची एकच योजना असेल .इंडेक्स फंड , ई टी एफ , सेक्टरल फंड यासारखे अपवाद वगळता सध्या अस्तित्वात असलेल्या सारख्या योजना एकमेकात विलीन करणे अथवा बंद करणे या संबंधी फंडाचे मत आणि भविष्यातील योजना यासंबंधीची माहीती, यातील कोणत्याही प्रकारांत न बसणाऱ्या योजनांची माहीती विहित नमुन्यात सेबीकडे दोन महिन्यात देवून आवश्यक त्या उपाययोजनांना मंजूरी घेवून पुढील तीन महिन्यात त्याची अमलबजावणी करायची आहे .

म्यूचुअल फंड व्यवसायाच्या दृष्टीने हे आमूलाग्र बदल होईपर्यंत अल्पकाळासाठी ही थोडी कठीण परिस्थिती असेल .काही तज्ञांच्या मते दोन योजनांच्या विलिनीकरणामुळे योजनेच्या मालमत्तेत मोठ्या प्रमाणात वाढ होईल त्याचा कामगीरीवर परिणाम होवू शकेल . नविन वर्गीकरणामुळे अधिक गोंधळ होवून म्यूचुअल फंडापासून गुंतवणूकदार दुरावण्याची शकता आहे .हे नियम निरंतर (open ended ) योजनांना लागू असल्याने अनेक बंदिस्त योजना (closed ended) यापुढे बाजारात येण्याची शक्यता आहे . तर सेबीचे मतानुसार या बदलामुळे येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या फंड हाउसची एक प्रकारची योजना आणि एक प्रकाराची गुंतवणूक पद्धत असल्याने त्यांच्या कामगीरीचा आढावा घेवून तुलना करणे सहज कोणालाही शक्य होईल त्यामुळे सामान्य गुंतवणुकदारांला त्याच्या गरजेनुरुप जोखिम पत्करून फंडाची निवड सहज करता येईल .याचे फलित काय होईल ते नजीकच्या काळात कळेलच .
 

उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

Tags : ,