COMPANY PROFILE

Page Title

Home / COMPANY PROFILE

Arthsamruddhi Investing Hub

We are AMFI registered financial Distributor of Mutual Funds

and other Financial Products, with vast experiences in financial industry and serving a large number of happy investors.

We offer the complete range of financial products and insurance in a single platform and We help and guide you to choose the right financial products to help achieve your financial goals successfully.

Our comprehensive online smart wealth management platform empowers you to have access to your entire wealth portfolio across Mutual Funds, Direct Equity, Fixed Deposits, Insurance etc at a single place.

अनुराग गेला आणि पैशाचं झाड चा जन्म झाला ..... सन २००९ साली माझा अनुराग हा पहिला मुलगा वारला . सुरुवातीला त्याची आठवण म्हणून झाड लावण्याची इच्छा होती .परंतु मी अनुराग प्रकाशन तयार केले .

समाजात आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी पैशाचं झाड पुस्तक लिहीण्याचे ठरवले . पुस्तकाचे एकही अक्षर लिहीले नव्हते त्यावेळी पैशाचं झाडचा लेखक रविंद्र कदम असे आयडेंटी कार्ड तयार करून १००० लोकांना वाटले . कार्डवर अग्नीतून उठून पेटलेल्या अवस्थेत आकाशाकडे झेप घेणाऱ्या फिनीक्स पक्षाचे चित्र छापले .जून २०१२ साली प्रत्यक्ष पैशाचं झाड हे पुस्तक अनुराग प्रकाशनच्या माध्यमातून प्रकाशित केले .

आर्थिक साक्षरतेवर "सोनं चांदी गुंतवणूक" पुस्तक प्रकाशित झालं .

समृध्दीचा जन्म झाला होता . माझ्यासारख्या अग्नीतून उठून पेटलेल्या फीनीक्सप्रमाणे आकाशाकडे झेपावणाऱ्या तरूणापुढे समृध्दीचे अंध, अपंग आणि मतीमंद असण्याचे चॅलेंज उभे राहिले .

संत तुकाराम आणि चार्वाक हे दोन जीवलग मित्र पुस्तकांच्या रूपात भेटले . त्यांनी मला मानसिक आधार दिला आणि सन २०१५ साली आनंदाचे सिक्रेट ... आनंदवेल हे पुस्तक प्रकाशित केले .

अर्थसमृध्दी प्रकाशनची पायाभरणी झाली . अर्थसमृध्दी मधील समृद्धी हे नाव माझ्या मूलीचे आहे . अर्थ हा शब्द संत तुकारामांच्या अभंगातील आहे .